बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधून दोन लाखांचे दागिने लांबविले

चाळीसगाव-लाईव्ह लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव बसस्थानका बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून तब्बल दोन लाखांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भगवानसिंग रामदास पाटील (वय-६०) रा. जव्हार जि. पालघर हे आपल्या पत्नी सुवर्णा यांच्यासह चाळीसगाव येथे आलेले होते. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ते पत्नीसह चाळीसगाव बसस्थानक येथे आले. पाचोरा-मालेगाव बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पत्नी जवळील पर्समधून सुमारे २ लाख रूपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बसमध्ये तपास केला. परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुनहा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भुषण पाटील करीत आहे.

Protected Content