शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह दोन हजार कोटीत विकत घेतले : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे दोन हजार कोटी रूपयांना विकत घेतले गेले असल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना शिंदे आणि भाजपवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून पैशांचा प्रचंड गैरवापर होत आहे. आमदारांना ५० कोटी तर खासदारांना १०० कोटी रूपये खर्चून त्यांच्याकडे वळविण्यात आले आहे. अगदी शाखाप्रमुख आणि नगरसेवकासाठी ५० लाखांचा दर लावण्यात आलेला होत. आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याचा निर्णय हा दोन हजार कोटी रूपयात विकत घेण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील राऊत यांनी केला.

दरम्यान, संजय राऊत यांनी आज भारतीय जनता पक्षावर देखील कडाडून टीका केली. ते म्हणाले की, अमित शाहा यांना कुणी गांभिर्याने घेत नाही. आज कुणाचा पराभव झाल्याचे चित्र असले तरी आगामी काळात जनता त्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा देखील खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी दिला.

Protected Content