Home Cities अमळनेर शेतात अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग

शेतात अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग

0
41

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनीवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी ही ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शेतात बकऱ्या जाण्यासाठी गेली होती. त्यावेळेस गावात राहणारा राज राठोड (वय-२४) याने एकटी असल्याचा फायदा घेत तिचा हात पकडून अंगलट करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेवढ्यात अल्पवयीन मुलीचे नातेवाईक आल्याने हा प्रकार उघडकीला आला. या संदर्भात पीडित मुलीने शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी राज राठोड यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहे.


Protected Content

Play sound