विजेचा धक्का लागल्याने शेताच्या बांधावर एकाचा मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल ते भुसावळ रस्त्यावरील शेताच्या बांधावर विजेचा धक्का लागल्याने एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

येथील भुसावळ मार्गा वरील रस्त्यावरील एका शेतातील बांधावर पन्नास वर्षीय व्यक्ति मरण पावलेल्या अवस्थेत मिळुन आला आहे. याबाबतची अधिक माहिती पोलीसांकड्डन घेतली असता सदरच्या मयत व्यक्तीचे नांव विशाल रमेश मेढे ( वय ५०, रा. अडावद तालुका चोपडा ) यांचा असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या व्यक्तिचा मृतदेह यावल भुसावळ मार्गावरील रस्त्यावर टेलीफोन एक्सचेंज च्या कार्यालया समोरील परिसरातील प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या गट क्रमांक ७२४ /२या शेताच्या बांधावर आढळून आला आहे. सदर इसम हा शॉक लागल्याने जागीच मरण पावल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असुन घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे . परिसरात घटनेची माहिती मिळताच लोकांनी धाव घेत मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविला. तर शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content