उत्तर महाराष्ट्र बास्केट बॉल स्पर्धेत पाचोरा संघ विजेता

पाचोरा प्रतिनिधी । जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ॲण्ड मॅनेजमेंट विद्यालय, शिरसोली रोड, जळगांव येथे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक विराज कावडिया यांचेतर्फे २५ वर्षाच्या आतील पुरुषांची उत्तर महाराष्ट्र बास्केट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा संघाने बाजी मारत विजेते पद पटकाविले.

या स्पर्धेत धुळे, जळगांव, ऑ. फॅ. वरणगाव, नंदुरबार, चाळीसगाव येथील संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन करत पाचोरा व चाळीसगाव संघाने अंतिम सामन्यात मजल मारली. आज दि. २४ रोजी सायंकाळी रंगलेल्या अंतिम सामन्यात पाचोरा संघाने ४२ गुण तर चाळीसगाव संघाने १५ गुण मिळविले. यात पाचोरा संघाने २७ गुणांनी विजय मिळवला. तर चाळीसगाव संघास उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. पाचोरा संघास विराज कावडिया, जितेंद्र शिंदे यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले. विजेत्या पाचोरा बास्केट बॉल संघास मुख्य प्रशिक्षक दिपक (आबा) पाटील व सुशांत जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी अभिनंदन केले आहे.

 

Protected Content