*करगाव येथील आश्रम शाळेत संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात*

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील करगाव येथील माध्यमिक आश्रम शाळेत संत श्री सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

तालुक्यातील करगाव येथील जगनभाऊ राठोड प्राथमिक आश्रमशाळा आणि लोकनेते काकासाहेब जी.जी.चव्हाण माध्यमिक आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे सपोनि रमेश चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय व्याख्याते प्रा.डॉ.विनोद रामराव राठोड उर्फ वीरा राठोड हे विराजमान होते.

यावेळी व्यासपीठावर प्रा. कमलेश चव्हाण, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक डी.व्ही.पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक विजय रामदास बोरसे, पर्यवेक्षक कवी-मनोहर आंधळे, आर.एस.पी.कमांडंट तथा या जयंती समारंभाचे आयोजक सुकदेव नारायण राठोड, सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचे प्रायोजक शिक्षक-नरेंद्र जामसिंग नाईक, सेवालाल महाराज वेशभुषा साकारलेला विद्यार्थी भुपेश किशोर राठोड व करगाव (ईच्छापूर) ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक मनोहर आंधळे, सूत्रसंचालन सुकदेव राठोड यांनी तर आभार कलाशिक्षक डी.यू.चव्हाण यांनी केलेत. संत सेवालाल महाराज वेशभुषा परिधान केलेला विद्यार्थी भूपेष राठोड यांस अश्वारूढ करुन आश्रमशाळेच्या प्रांगणापासून ते करगाव तांडा नं १, २ व ३ पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी फेटे बांधून सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक पी.एस.पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content