जगवानी नगरात दुचाकीच्या अपघातात महिला जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील जगवाणी नगरातच्या कमानीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत महिला जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसीतील जगवानी नगर कमानीजवळून रोहिणी अतुल ठाकरे (वय-२४) रा. जयभवानी नगर, एमआयडीसी हे त्यांच्या दुचाकी (एमएच १९ डीएक्स १३०३) ने सोमवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी जात असतांना समोरून येणाऱ्या (एमएच १९ झेड २३३१) ने जोरदार धडक दिली. यात धडकेत रोहिणी ठाकरे या जखमी झाल्या आहेत. त्यांना जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी सोमवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून (एमएच १९ झेड २३३१) वाहनाच्या चालकाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलिस नाईक अतुल पाटील करीत आहेत.

 

Protected Content