चाळीसगावात मोबाइल चोरणारे पुणे पोलिसांनी पकडले

 

 

चाळीसगाव : प्रतिनिधी । घाट रास्ता भागातून मोबाईल चोरणारे चोरटे पुण्यात पोलिसांनी पकडल्यावर येथील मालकाला माहिती दिल्यानंतर आता चाळीसगाव पोलीस पुढील कारवाई करीत आहेत

 

हॉटेलचे काम आटोपून घरी  पायी जाताना एकाच्या हातातून मोबाईल हिसकावून नेल्याची घटना शहरातील घाट रोडवर  घडली होती. मात्र अट्टल मोबाईल चोर पुणे पोलीसांच्या हाती लागल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

अशोक सुरेश राठोड (वय- २४ रा. गोकुळधाम, घाट रोड ता. चाळीसगाव) सह्याद्री हॉटेल चालवून उदरनिर्वाह करीत आहेत. २० मे रोजी रात्री ९:३० च्या  सुमारास अशोक काम आटोपल्यानंतर  घरी जात असताना पाठीमागून लाल रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या  हातातील १५००० हजार रुपये किंमतीचा मोबाईल (विवो व्हाय- २०) हिसकावून नेल्याची घटना घाटरोड वरील रघुवीर व्यायाम शाळेच्या समोर घडली होती. तो  मोबाईल  मित्र चंद्रकांत  चौधरी याच्या मालकीचा होता. अशोक हा तीन महिन्यांपासून  मोबाईल वापरत होता. या गोष्टीची भनक घरच्यांना लागू नये म्हणून कुठेही त्यांनी वाच्यता केली नाही. परंतु पुणे येथील पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या गुणवंत युवराज पाटील व स्वप्निल भागवत भंगाळे (दोघेही रा. पुणे) यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे असलेला मोबाईल अशोक याचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर पुणे येथील पोलीसांनी २५ जून रोजी अशोक राठोड यांच्याशी फोनवरून संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार अशोक राठोड यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-३९२,३४ नुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे

 

Protected Content