विजांच्या कडकडाटासह जळगावात पावसाची हजेरी

जळगाव : प्रतिनिधी । शहरात आज दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह  पावसाचे आगमन झाले . आधी रिमझिम बरसणाऱ्या हलक्या सरींनी अडीच वाजेनंतर जोर पकडला होता 

 

यंदा आगमनाचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात   बरसलेला  आहे तथापि पावसावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या पेरण्यांना वेग आलेला नसला तरी मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कपाशी लागवड केली आहे अशा ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या कपाशीलासुद्धा  आज झालेल्या पावसाचा फायदा होईल अशी आशा आहे  साधारण १५ मिनिटे शहरात पावसाचा जोर चांगला होता सगळीकडे अंधारून आले आभाळ भरून आलेले होते त्यामुळे अन्यत्र शहराजवळच्या भागात पावसाचा जोर चांगला असावा असा अंदाज लोक व्यक्त करीत होते

 

कृषी खात्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची घाई अपुऱ्या पावसात करू  नये असे आवाहन केल्यामुळंही पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे आता पेरणीयोग्य पाऊस जोरात पडता  झाल्याची आशा आजच्या पावसाने वाढवली आहे

 

Protected Content