सूरज झंवरला भुजबळ व राऊतांच्या नावाने फोन; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी | बीएचआर गैरव्यवहारातील संशयित सूरज सुनील झंवर याला मंत्री छगन भुजबळ व जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नावाने तोतया व्यक्तीने फोन केल्याची घटना घटली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर हा उच्च न्यायालयात कामानिमित्त गेला असताना त्यास ९४२३४२११११ क्रमांकावरुन फोन आला. मी पंकज भुजबळ बोलत असून ८ सप्टेंबर २०२१ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मला येऊन भेटा, असे सांगत फोन बंद केला. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावरुन फोन करुन मी भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगून तुम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले नाही. कलेक्टर साहेबांचा पीए वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळात जळगाव येथील एका लँण्डलाइन क्रमांकावरुन मी अभिजित राऊत (जळगाव कलेक्टर) बोलतोय…तुमचे काही काम आहे का? अशी विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर त्यांनी फोन ठेवला. या प्रकारानंतर सुरज झंवर यांनी जिल्हाधिकारी राऊत यांची भेट घेतली. त्यांनाही या प्रकारासंदर्भात काहीच माहिती नव्हती. त्याचवेळी नाशिकवरुन पंकज भुजबळ यांचा फोन आल्याचे जिल्हाधिकारींच्या पीएने सांगितले. त्यानंतर पुन्हा तिसर्‍या मोबाइल पंकज भुजबळ बोलत असल्याचा फोन आला. त्यांनी लँण्डलाइनवरुन फोन करण्यास सांगितले.

दरम्यान, सुरज झंवर यांनी जळगाव येथील मित्राच्या लँण्डलाइनवरुन फोन लावला असता, स्वतः छगन भुजबळ बोलत असल्याचे बतावणी करीत माझा फोन आल्याचे कोणाला सांगणार नसल्याचा शब्द मागितला. यानंतर माझे एक काम करुन द्या, मी तुमचे मोठे काम करुन देतो, असे देखील सांगण्यात आले. या प्रकरणी अंबड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content