गो. से. विद्यालयात स्वाध्याय प्रशिक्षण वर्ग उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । येथील पाचोरा सहकारी शिक्षण संस्था संचलीत श्री. गो. से. विद्यालयात नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या स्वाध्याय उपक्रमांसाठीचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला.

पाचोरा सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल मध्ये इयत्ता नववी व दहावीच्या वर्गांसाठी शासनाच्या स्वाध्याय उपक्रमांसाठीचे प्रशिक्षण वर्ग कलादालनात पार पडला.

या प्रशिक्षण वर्गात गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी स्वतः मोबाईलवर विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडविण्यासाठी आवश्यक असलेली लिंक आणि त्या लिंक द्वारे स्वाध्याय सोडविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले. यावेळी नववी व दहावीच्या वर्गातील ८५ विद्यार्थी उपस्थित होते. या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुपवर संबंधित लिंक आणि फोन नंबर पाठविण्यात आले असून त्या माध्यमातून शाळेतील नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या स्वाध्यायाला जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी हा स्वाध्याय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Protected Content