नेरी विकासोत भाजपा प्रणित युवा शक्ती पॅनलचा विजय

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा येथील वि. का. सोसायटी पाठोपाठ नेरी ता. पाचोरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रणित युवा शक्ती पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

नेरी वि. का. सोसायटी मध्ये निवडुन आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे :- 

सर्वसाधारण मतदार संघातून  – अशोक पाटील (१३७), रवींद्र पाटील (१३३), साहेबराव पाटील (१३२), अशोक पाटील (१३१), विजय सुर्यवंशी (१३०), अंकुश पाटील (१२७), किशोर बोरसे (१२७), बशीरखा पठाण (११९)

महिला राखीव मतदार संघातून – सिमा पाटील (१३२),  निर्मला पाटील (१२९)

इतर मागासवर्गीय मतदारसंघातून –  ज्ञानेश्वर पाटील (१३०)

अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून – सोमा  अहिरे (१२७)

विमुक्त जाती/भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून – धर्मा गढरी (१४३)

नेरी वि. का. सोसायटीच्या विजयासाठी गावांतील तरुण, जेष्ठ नागरिक, महिला व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून हा विजय संपूर्ण गावाचा विजय आहे. तसेच येणाऱ्या काळांत वि. का. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने विविध सेवा सुविधा देत येतील यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असे निवडुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालकांनी सांगितले.

तसेच विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी नगरदेवळा- बाळत गट ताब्यात घेण्यासाठी एका प्रकारे मोर्चे बांधणी सुरू असुन या गटातील जिल्हा परिषद निवडणुकीत नगरदेवळा, बाळद, नेरी यासारख्या मोठ्या गावांचे मताधिक्य निर्णायक ठरत असते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही सर्व गावे जी एकेकाळी शिवसेनेचे बालेकिल्ले म्ह्णून ओळखली जात होती. तीच गावे सर करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रमाणात यश ह्या गटातून मिळु शकते अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!