Home Cities जळगाव महिला बचाव सेवा संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शीतल सोनवणे यांची नियुक्ती

महिला बचाव सेवा संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शीतल सोनवणे यांची नियुक्ती

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांवरील अत्याचारग्रस्तांना तातडीची मदत, कायदेशीर मार्गदर्शन, संरक्षण आणि महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शीतल काशिनाथ सोनवणे (रा. द्वारका नगर, जळगाव) यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महिला बचाव सेवा संस्था या देशव्यापी संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांची मानवसेवा अधिकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार म्हणूनही नियुक्ती करण्यात आल्याने विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

महिला बचाव सेवा संस्था ही संपूर्ण भारतभर महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत असून, संकटात सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत, कायदेशीर सल्ला, संरक्षण आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. तसेच कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा छळ रोखणे, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांना मदत करणे, घटस्फोटित महिलांना कायदेशीर, आर्थिक आणि भावनिक आधार उपलब्ध करून देणे, महिला सशक्तीकरण व रोजगारनिर्मितीसाठी मार्गदर्शन करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांत संस्था सक्रिय आहे. शीतल सोनवणे या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, महिलांच्या समस्या सोडविणे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणे तसेच स्वावलंबी जीवनासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे राज्यभरातील महिलांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यास मदत होईल, तसेच महिला संरक्षण, सशक्तीकरण आणि सामाजिक न्यायाच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound