जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स व कॉमर्स येथे प्रॉस्पेक्टिव्ह रिसर्च स्कीमचा बक्षीस वितरण समारंभ व कॉपेंडीयम ऑफ रिसर्च आर्टिकल बाय प्रोस्पेक्टिव रिसर्चरसचे प्रकाशन प्रा. एस. एस. राजपूत, अधिष्ठाता, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा केबीसी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही एस झोपे, प्रॉस्पेक्टिव्ह रिसर्च स्कीमचे समन्वयक डॉ. आर. एम. पाटील उपस्थित होते. माननीय राजपूत सरांनी संशोधन प्रकल्प कसे कसे लिहावे त्यात नाविन्य कसे आणावे व त्यातून संशोधन निबंध कसा तयार करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
सदर संशोधन प्रकल्पांना विषयनिहाय बक्षिसे वितरण करण्यात आले त्यात ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये प्रथम आलेले महिपाल राजपूत, शीतल होले, पल्लवी पाटील, शुभांगी पाटील, तुषार माळी व माधवी पाटील यांना मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रथम आलेले स्नेहल सोनावणे, गायत्री पाटील, पूनम पाटील, वैष्णवी वाणी आणि आचल पवार यांना बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रथम आलेले योगेन्द्रसिघ राजपूत, अपेक्षा पाटील, निखील पाटील, कविता पाटील, भाग्यश्री महाजन, आकांक्षा पाटील आणि सैमा मिर्झा आणि अँनालेटीकल केमिस्ट्री मध्ये प्रथम आलेले अक्षय पाटील, लोकेश भिरूड, सुरज पाटील आणि निखील महाले यांना पारितोषिक व कॅश प्राइजेस देण्यात आली.
डॉ. आर. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. व्ही एस झोपे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन प्रा. एस. एन. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. रुपाली चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.