धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी पुरूषाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज जळगाव । शहरातील बजरंग बोगद्याजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अंदाजे ५० वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील बजरंग रेल्वे बोगद्याजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१६/२५ डाऊन लाईनवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अंदाजे ५० वर्षीय अनोळखी पुरूषाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक समाधान कंखरे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील हे करीत आहे.

Protected Content