Crime Detect : सिंधी कॉलनीत घरफोडी करणारे दोघे जेरबंद; एलसीबीची कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी कॉलनीत बंद घरातून पाच लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना तांबापूरातून अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनीतील साधना आश्रमजवळील कंवरनगरातील रोहीत इंद्रकुमार मंधवानी हे कुटुंबियांसह त्यांच्या आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी अमरावती येथे गेले होते. दरम्यान २६ रोजी ते लग्नकार्य आटोपून घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर त्यांना घरातील लोखंडी कपाटातून रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने आणि मिक्सरच्या मोटार असा एकूण ४ लाख ९४ हजारांचा ऐवज लांबविल्याचे दिसून आले. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे तांबापूरा भागात राहत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे पथक रवाना केले. संशयित आरोपी हनीफ काकर (वय-२०) आणि त्याचा साथीदार अन्सार शहा रूबाब (वय-१९) रा. तांबापूरा यांनी तांबापूरात अटक करण्यात आली. दोघांनी घरफोडीची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कामगिरी

स्थानिक गुन्हे शोखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.

Protected Content