व्यवसायिकाची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या संशयिताला राजस्थानमधून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामास लागणारे स्टिल मटेरीयलची कंपनी असून हे मटेरीय पाठवितो असे सांगत वृद्धाची १६ लाखात ऑनलाईन फसवणुक करणार्‍या ललितकुमार तुलसीराम खंडेलवाल (वय-३८, रा. छिपावली ता. जि. सिरोही राजस्थान) याच्या राजस्थानमधून अटक केली आहे, अशी माहिती जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता दिली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर येथील मोहनलाल देवजी पटेल यांना संशयित ललितकुमार खंडेलवाल याने फोन करुन आमची आयएसओ टॉप्स इंडिय मेटल ट्रेडर्स नावाची कंपनी आहे. आम्ही तुम्हाला बांधकामाल लागणारे स्टिल मटेरीयल पाठवितो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांना टॅक्स इनव्हॉईस व बनावट ई वे बिल पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख २७ हजार रुपये घेत त्यांची ऑनलाईन फसवणुक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ मार्च रोजी संशयित ललितकुमार खंडेलवाल यांच्या सायबर पोलिसांनी राजस्थान येथून मुसक्या आवळल्या आहे, अशी माहिती जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता दिली आहे.

Protected Content