मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे आदिशक्ती मुक्ताई चरित्र व संगीतमय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .या सप्ताहाचे हे 7वे वर्ष आहे या आदिशक्ती मुक्ताई चरित्र व संगीतमय अखंड हरिनाम सप्ताहाचे कथावाचक ह.भ.प. दिलीपजी महाराज साठे बेलाड तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा हे आहे .हा सप्ताह पौष शुद्ध 5 दिनांक 15 जानेवारी 2024 रोज सोमवार ते पौष शुद्ध 12 दिनांक 22 जानेवारी 2024 रोज सोमवार पर्यंत आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शक ह.भ.प. मनोहर देव महाराज अंतुर्ली हे आहे.
या सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती सकाळी 5 ते 6, विष्णुसहस्रनाम सकाळी 7 ते 8, मुक्ताई चरित्र वाचन दुपारी 12ते 4, हरिपाठ संध्याकाळी 5 ते 6, हरिकीर्तन रात्री 8 ते 10 या सप्ताह काळात वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन ठेवलेले आहे. दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सोमवारी ह.भ.प. जनाताई डोंगरे आळंदी यांचे कीर्तन, दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी मंगळवारी ह.भ.प. पंकज महाराज भानगुरा यांचे कीर्तन, दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी बुधवारी ह.भ.प. भारतीताई महाराज धोटे परखेड यांचे कीर्तन, दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी गुरुवारी ह.भ.प. मनोहरदेव महाराज अंतुर्ली यांचे कीर्तन, दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी शुक्रवारी ह.भ.प. शिवा महाराज बावस्कर जळगाव जमोद यांचे कीर्तन, दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शनिवारी ह.भ.प. अभिषेक महाराज शेगावकर यांचे कीर्तन, दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी रविवारी ह.भ.प. स्वामी रामभारती महाराज चांगेफळ यांचे कीर्तन या सप्ताहासाठी सात संगत तबला ह.भ.प. चांगदेव महाराज पिंपळखुटा, मृदुंगाचार्य ह.भ.प. किरण महाराज धामणदे, ह.भ.प. प्रल्हाद महाराज वसाड, ऑर्गनवादक ह.भ.प. समाधान महाराज पोफळी, गायक- ह.भ.प. हरिभाऊ महाराज गाडेगाव ,ह.भ.प. पशुराम महाराज टाकळी, ह.भ.प. रत्नाकर महाराज तांदुलवाडी, ह.भ.प. प्रवीण महाराज बुरटी, ह.भ.प. कैलास महाराज खेरडा, ह.भ.प. लक्ष्मण महाराज कुंड, ह.भ.प. गजानन महाराज मोताळा या सप्ताहाचे काल्याचे किर्तन दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सोमवारी ह.भ.प. दिलीपजी महाराज साठे यांचे सकाळी 9 ते 11 या वेळेत आहे नंतर महाप्रसाद 12ते4या वेळेत आहे व दिंडी सोहळा संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत आहे.