खडकदेवळा येथे उद्या फिरते लोकन्यायालय

पाचोरा, प्रतिनिधी । न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत तालुक्यातील खडकदेवळा खु. येथे उद्या फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत  लोक अदालत , कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

उच्च न्यायालय, विधी सेवा उपसमिती, औरंगाबाद यांचे आदेशान्वये जून महिन्यात जिल्हयात मोबाईल व्हॅन (फिरते लोकन्यायालय) चे जिल्ह्यातील १४ तालुक्यात दि. १५ ते २८ जुन २०२१ या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उद्याशनिवार  दि. २६ जुन रोजी मोबाईल व्हॅन (फिरते लोकन्यायालय) पाचोरा तालुक्यात येत आहे. या फिरत्या  लोकन्यायालयाचे  आयोजन जिल्हा परिषद शाळा खडकदेवळा खु येथे करण्यात आलेले आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी या लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश एफ. के‌. सिद्दीकी यांनी केले आहे. या मोबाईल व्हॅनचे माध्यमातून लोक अदालत तसेच कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे लोक न्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ, पक्षकार व कर्मचारीवृंद परिश्रम घेत आहेत.

 

Protected Content