सचिन जगताप यांची ई-फेरफार व ई-चावडीच्या प्रकल्प स्थायी समितीवर निवड

यावल,   प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील  मंडळ अधिकारी सचिन जगताप यांची ई-फेरफार व ई-चावडीच्या प्रकल्प स्थायी समितीवर निवड करण्यात आली आहे. 

 

ई -फेरफार स्थायी समितीचे राज्य समन्यव्यक रामदास हरिभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वयक महासंघ समीतीचे प्रदेश अध्यक्ष शाम जोशी यांनी ई-फेरफार व ई-चावङी प्रकल्प स्थायी समितीवर नासिक महसूल विभागातून मंडळ अधिकारी संवर्गातून सचिन जगताप यांची निवड जाहीर केली. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अमिअभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली ई-फे रफार व ई-चावडी प्रकल्प स्थायी समित्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनच्या महसुलव विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक अभीलेख विभागाअंतर्गत झालेल्या समितीच्या  निवडीबद्दल फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार महेश पवार,  निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार , नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष दिपक गवई यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी यांनी सचिन जगताप यांच्या निवडीचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्यात.

 

Protected Content