कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा ; खासदार उन्मेष पाटील यांची मागणी (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । आसोदा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाचे काम बंद आहे. फक्त जयंती व पुण्यतिथीला निधीची घोषणा होते नंतर काही त्यावर कार्यवाही होत नाही नसल्याने खासदार उन्मेष पाटील यांनी नाराजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यक्त केली.

बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी खासदार उन्मेष पाटील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रलंबित स्मारकाचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी पुढे जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी मंजूर आहे का, असेल तर मिळणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला. निसर्ग कन्येची जन्म झालेल्या जिल्ह्यात हेळसांड होत असेल तर काय बोलावे?अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार पाटील यांनी व्यक्त केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी निधी केव्हा मंजूर होईल ?
काम केव्हा पूर्ण होईल ? असे प्रश्न उपस्थित करत आजच्या आज नियोजनमधून निधी मंजूर करावा अशी मागणी केली. काम पूर्ण केव्हा होईल यासाठी तातडीने पूर्ण स्मारकाचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/225017785929948

Protected Content