माजी आमदार वळवी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

jagadish valavi 1

 

चोपडा प्रतिनिधी । तालुक्याचे माजी आ. जगदीश वळवी यांनी आज दि.२९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील अजंतीसीम येथील जि.प प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप केले. यावेळी त्यांनी मोहिदा व दगडी या गावांनाही भेट देवून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.

याबाबत माहिती अशी की, जगदीश वळवी यांच्याकडे अजंतीसीम गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलांना शाळेसाठी दप्तर पाहिजे, असा आग्रह गावातील सामाजिक कार्यकर्ते सोपान पाटील यांनी जगदीश वळवी यांच्याकड़े धरला होता. त्या अनुषंगाने माजी आ.जगदीश वळवी यांच्या सौजन्याने इयत्ता 1ली ते 4थी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी व गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात जगदीश म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे गरजेचे असून हा खऱ्या अर्थाने तुमचा शिक्षणाचा पाया आहे. मन लावून शिकू आई-वडीलांचे नाव उचवणे. माझे वडील रमेश पान्या वळवी हे त्यांच्या काळात डोक्यावर लोखंडी पेटी घेवून 25 किलो मीटर पायी प्रवास करुन शाळेत जायचे. त्यावेळी त्यांनी 7 वी फायनल पास केली. पण ते थांबले नाही, त्यांनी पुढे बीए नंतर एलएलबी करीत आदिवासी समाजातील पाहिले वकील होण्याचा मान मिळवला. ते शिकले म्हणून आज मी व माझा परिवार सुस्थितीत आहे. आजची शिक्षण पद्धती खुप चांगली व आपल्याला साऱ्या सोयी-सुविधा आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी उच्च शिक्षण घ्यावे, भविष्यात स्वप्न बघायचे असतील तर आयएस, आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न बघा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी चोपडा पं.स.चे माजी सभापती प्रा.भरत पाटील, वराड येथील माजी सरपंच सुनील महाजन, विजय कोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण कोळी, विजय पाटील, संतोष पाटील, अरुण पाटील, भरत पाटील, प्रवीण पाटील, बालू पाटील, सुरेश पाटील, कमलाकर पाटील, रूपचंद कोळी, निंम्बादास भागवत, शिक्षक अमृत पाटील, आदी ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक प्रवीण माळी यांनी तर सूत्रसंचालन सोपान पाटील यांनी केले.

गावाक-यांनी व शालेय व्यवस्थापन समितीने दप्तर दिल्यामुळे माजी आ.जगदीशभाऊ वळवी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करुन आभार व्यक्त केले. मोहिदा गाव भेटी प्रसंगी गावातील दत्त मंदिरात बैठक आयोजित करुन गाव तुमच्या पाठीशी राहील असे आश्वासन देण्यात आले. यावेळी पंढरीनाथ पाटील, रमेश पाटील, यशवंत पाटील, निम्बा पाटील, अशोक पाटील, नंदराम पाटील, दत्तू पाटील, सुनील पाटील, मंगल पाटील, सीताराम पाटील, शांताराम पाटील, दगा पाटील, गजानन पाटील, बळीराम पाटील, सुरेश पाटील, अरुण पाटील, सोपान पाटील, पंढरीनाथ पाटील, बाळासाहेब पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दगडी गावाच्या भेटीत दगडी येथील गावाक-यांनी देखील जगदीश वळवी यांना पसंती दाखवत मनापासून सहकार्य स्वागत करत करण्यात आले. यावेळी मूलचंद पाटील, भगवान पाटील, खुशाल पाटील, विजय पाटील, पुंडलिक पाटील, चंद्रभान पाटील, दत्तू पाटील, संतोष पाटील, सोपान पाटील, समाधान कुंभार यांच्यासह चोपडा येथील नाना देसले पत्रकार शाम जाधव हजर होते.

Protected Content