अमळनेर येथे मोफत ई-श्रम नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर प्रतिनिधी । भाजपाचे दिवंगत नेते स्व.उदय वाघ यांच्या जयंती निमित्ताने आज असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोफत ई-श्रम नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

माजी आ.स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली व भाजयुमो च्या प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका व शहर भाजयुमोने हे अभियान आयोजित केले होते. अमळनेर शहरातील असंख्य असंघटित कामगार तसेच महिलांनी ई-श्रम कार्ड नोंदणी साठी एकच गर्दी केली होती. धुळे रोडवरील बाजार समिती समोरील स्व.उदय वाघ यांच्या स्मारकस्थळी भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविन्यात आले. दरम्यान,ई-नोंदणी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपचे शहरातील तसेच ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content