… आधी पंतप्रधानांची केली नक्कल; नंतर मागितली माफी

मुंबई वृत्तसंस्था | हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत अंगविक्षेप करत अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. मात्र विरोधी पक्षाचे सदस्य भडकल्यानंतर माफी मागितली.

“देशाचे पंतप्रधान यांनी “१५ लाख रुपये खात्यावर देईल असं म्हटलं होतं पण त्यांनी ते आश्वासन पाळलं का असा प्रश्न करत कोरोनाच्या परिस्थिती नंतर वीज बिलात सूट दिली पाहिजे अशी अपेक्षा कशी बाळगता ? असा प्रतिप्रश्न मंत्री नितीन राऊत यांनी वीजेसंदर्भातील एका प्रश्नावर बोलताना केला. यावर संतप्त होत फडणवीस यांनी “पंतप्रधान यांनी असं वाक्य कुठ म्हटलं आहे हे दाखवा नाही तर माफी मागा” असं म्हणाले. यावर नितीन राऊत यांनी “पंतप्रधान यांनी पहिल्या निवडणूकीत काळा पैसा भारतात पत्र आणून त्यातून 15 लाख रुपये दिले जातील असं म्हटलं होतं. हे खोटं असेल तर सिद्ध करून दाखवा” असा पलटवार केला.

आमदार भास्कर जाधव यांनी अंगविक्षेप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लकबीची नक्कल केल्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस यासह विरोधक भडकले व गदारोळ माजला. ”पंतप्रधानांचं अंगविक्षेप करत जाधव यांनी सभागृहात जे वर्तन केलंय ते चुकीचं असून भास्कर जाधव यांना निलंबित करा.” असं फडणवीस म्हणाले.

यावर भास्कर जाधव यांनी, “मी ते पंतप्रधान होण्याअगोदरच बोललो असून मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो.” यावर “अंगविक्षेप मागे घेता येतो का? असा प्रश्न करत माफी त्यांनी माफी मागितली पाहीजे” अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर “मी शब्द मागे घेतले आहेत त्यामुळे यावर मी माफी मागू शकत नाही” असं उत्तर भास्कर जाधव यांनी दिलं.

मात्र गदारोळ वाढत चालल्याचं लक्षात घेत विधानसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित केलं. शेवटी विरोधक जास्तचं आक्रमक झाल्यावर भास्कर जाधव यांनी “मी कोणताही असंविधानिक शब्द वापरला नाही पण तरीही सभागृहाच्या काही भावना दुखावल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो.” असं म्हणत या गदारोळ नाट्यावर पडदा पाडला.

Protected Content