राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी ४ एप्रिल रोजी आज जाहीर झाली आहे. या यादीत दोनच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्या. बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा थेट सामना भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासोबत होणार आहे.

बीडमधून ज्योती मेटे यांना उमेदवार देण्यात येईल अशी चर्चा असताना शरद पवार यांनी मेटे यांना डावलून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. बजरंग सोनवणे यांनी २०१९ च्या निवडणूकीत प्रीतम मुंडे यांच्याविरोधात उतरले. त्यावेळी ५ लाखपेक्षा जास्त मते त्यांनी मिळवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.
भिवंडीमधून सुरेश सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाटयात महाविकास आघाडीतून दहा जागा मिळाल्या आहेत. त्यांनी यापूर्वी पाच उमेदवारांची घोषणा केली होती. यामध्ये अहमदनगरमधून नीलेश लंके, बारामतीमधून सुप्रिया सुळे, दिंडोरी मधून भास्कर भगरे, शिरुर मधून डॉ. अमोल कोल्हे व वर्धा लोकसभेतून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर झालेली असून हे उमेदवार प्रचाराच्या कामाला देखील लागले आहेत. आतापर्यंत शरद पवार गटाने सात जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहे. परंतू माढा, सातारा आणि रावेर या मतदारसंघात अदयाप सस्पेंस कायम आहे.

Protected Content