आ. संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ रॅली ; खा. रक्षाताई खडसेही सहभागी (व्हीडीओ)

f764b243 50ec 4e01 b47a 89fc24a807b7

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वरणगाव येथे भाजपा-शिवसेना, आरपीआय, रासप महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीत आज अक्षरशा जनसागर उसळला होता. या प्रचार रॅलीत खा. रक्षाताई खडसे याही सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.

 

येथील भवानीमंदिरापासून प्रचार रॅलीस प्रारंभ झाला. प्रचार फेरी विकास कॉलनी, मदिना चौक , भोईवाडा, इस्लामपुरा, गांधी चौक, हनुमान मंदिर, माळीवाडा, चौधरी वाडा रामजी बुवा चौक , मोठी होळी आदी परिसरातून गल्लीबोळात जाऊन आ. संजय सावकारे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रचार रॅलीमध्ये सर्व गटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रॅलीमध्ये नगराध्यक्ष सुनील काळे , तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे , जिल्हा परिषद माजी सदस्य राजेंद्र चौधरी , पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र पुंडलीक चौधरी , प्रशांत पाटील, शिवसेनेचे ॲड. चिकू दायमा, चंद्रकांत शर्मा , रवी सुतार, सूनील दिगंबर चौधरी , ज्ञानेश्वर मराठे , नगरसेवक गणेश धनगर , नगरसेवक बबलू माळी , माजी नगराध्यक्ष अरुणाताई इंगळे , चंद्रकांत हरी बढे , माजी सरपंच तथा नगरसेविका रोहिणी जावळे, माजी सरपंच सुभाष धनगर , संभाजी देशमुख , संजय डाहाके , गुड्डू बडे, शेख खलील , शेख मिर्झा , तळवेल येथील सरपंच डॉ. सुनील पाटील, प्रकाश शक्ती , यांच्यासह हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. यात युवक व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

 

Protected Content