बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेची धडक मोहीम; ५० रिक्षा जप्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेशीस्त प्रवाशी वाहतूक आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० रिक्षा चालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई करत रिक्षा जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाई न्यायालयाच्या आदेशाने करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी दिली.

 

जळगाव शहरात रिक्षा चालक मोठ्या प्रमाणावर बेशिस्तपध्दतीने रिक्षा चालवून प्रवाश्यांची वाहतूक केली असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार २२ डिसेंबर रोजी शहरातील अजिंठा चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, पांडे डेअरी चौक यासह इतर भागात वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एकूण ५० रिक्षावर कारवाई करत रिक्षा जप्त करण्यात आले. यात रिक्षाचालकाच्या बाजूला प्रवाशी बसविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविणे आदी गोष्टींमुळे अपघातात होवून प्रवाश्याच्या जीवीताला धोका निर्माण होवू शकतो या अनुषंगाने रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या ५० रिक्षाचालकांवर न्यायालयाच्या वतीने दंड आकारण्यात येणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी बोलतांना दिली.

Protected Content