पहूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरूणावर गुन्हा

पहूर ता. जामनेर । शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा रस्ता आडवून तिचा विनयभंग केल्याचा उघडकीला आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुलगी सायकलेने घरी जात असतांना गावातील अक्षय अर्जून मोरे (वय-२०) याने रस्ता आडवून मुलीचा विनयभंग केला. पोलीसात गेला तर मुले जमा करून मारहाण करेल अशी धमकी दिली. याप्रकरणी पिडीत मुलीने संशयित आरोपी अक्षय मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय बनसोड करीत आहे.

Protected Content