पाचोरा येथे सहा वाळू वाहनांवर प्रातांधिकाऱ्यांची कारवाई

sand1

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यात वाळु चोरांनी हैदोस घातला आहे. महसुल प्रशासनाच्या कार्यवाह्यांबाबत प्रसार माध्यमे व सोशल मिडियात टिका होत आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी विभागाची बदनामी व मरगळ झटकुन काढण्यासाठी स्वतः मैदानात  उतरून कारवाईचे अस्त्र उगारले आहे.

दि २० जुलै रोजी भल्या पहाटे कुरंगी,अतुर्ली , ओझर, शिंदाड पिपळगांवरोडवर आणि पाचोरा बाहेरपुरा अश्या विविध भागांतील सहा वाहनांवर धडक कारवाई करून दंडात्मक रक्कमेच्या नोटीसा संबंधीत वाळु चोरट्यांना बजावण्यात आल्याची माहीती नायब तहसिलदार अमित भोईटे यांनी दिली. पाचोरा तालुक्याच्या गिरणा नदी पात्रातुन तसेच नगरदेवळा अग्नावती धरणातुन व अन्य नद्यांमधुन वाळु चोरीने कळस गाठला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांत पाचोरा तालुक्याच्या सर्वच नद्यांमधून वाळु चोरट्यांनी दिवसा व रात्री वाळु चोरीचा प्रकार घडत आहेत. प्रातांधिकारी मागील काही महिन्यांपासून त्यांच्याकडील कामाचा व्याप वाढल्याने
त्यांनी वाळु चोरट्यांवरील कारवाईचे ओझे तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी, सर्कल सारख्या अधिकाऱ्यांनवर टाकले.  परंतु, नायब तहसिलदार अमित भोईटे व काही कर्मचारी सोडता ही जबाबदारी अन्य कोणी प्रामाणिकपणे पार पाडली नाही. तहसिलदार कैलास चावडे हे जिल्हयात व्दितीय क्रमांकाच्या दंडात्मक कारवाईचा दावा करीत असले तरी त्यांचे वाळु चोरट्यांवर  नियंत्रण नाही.  नगरदेवळा येथे सुमारे ४५० ब्रास अवैध रेतीसाठा असल्याच्या तक्रारी व शहानिशा झाल्याने महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात  जनतेतून नाराजीचा सुर उमटत आहे. याची दखल घेवुन प्रातांधिकारी राजेंद्र कचरे  यांनी दि. २० रोजी सकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास कुरंगी , पिपळगांव , शिंदाड रोड व अतुर्ली ओझर येथील तीन वाहने,  तहसिलदार श्री.चावडे यांनी एक आणि नायब तहसिलदार अमित भोईटे यांच्यासह तलाठी मयुर आगरकर , कर्मचारी कैलास बहीर, आर.डी.पाटील , विजय चव्हाण, वाहन चालक मिर्झा यांच्या पथकाने प्रांताधिकारी यांचा आदेशाने एकुण सहा वाळु वाहने ताब्यात घेवुन तहसिलच्या आवारात उभी करण्यात आली आहे. महसुल विभागात वाळुची वाहने सोडण्यासाठी तोडपाणी होत असलेल्या टिका महसुलच्या जिव्हारी लागल्याने या पुढे ताब्यात घेण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रती वाहन  १ लाख २४ हजार ६७३ रूपये दंडात्मक कार्यवाह्या होणार आहे. प्रातांधिकारी श्री. कचरे यांनी केलेल्या कारवाईत सहा वाहने सापडली असुन या सर्वांवर ७ लाख ४८ हजाराच्या दंडात्मक कारवाईच्या नोटीसा सबधितांना बजावण्यात आल्या आहे. तसेच या पुढे कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरता वाळु चोरट्यांवर कठोर व दंडात्मक कार्यवाह्या होतील असे संकेत मिळत आहे. पोलिस प्रशासनाला महसुलच्या परवानगी शिवाय चोरट्या वाळुची वाहने पकडण्याचे अधिकार नसतांना काही हप्तेखोर पोलिस वाळु चोरट्यांकडून हप्तेबाजी करीत असल्याच्या  तक्रारी महसुल विभागाच्या वरिष्ठांपर्यत पोहचत आहे. अश्या भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल पोलिस अधिक्षकांकडे पाठवावा व त्या हप्तेखोर पोलीस मुख्याल्यात जमा करण्यात येईल का ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

Protected Content