रामेश्वर कॉलनीत बंद घर फोडून ७० हजाराचा ऐवज लांबविणारा चोरटा जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील रोकडसह सोन्याची दागिने लंपास केल्याप्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, रामप्रताप किसनराम सैनी (वय-४२) रा. चौकड ता. खंडला जि. सिकर (राजस्थान) ह.मु. रामेश्वर कॉलनी हे स्टाईल व फर्शी बसविण्याचे काम करतात. १ जुलै २०२१ रोजी सकाळी ते आपल्या कुटुंबियांसह राजस्थान येथील गावाला गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. १ जुलै ते १७ जुलै २०२१ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील २५ हजार रूपयांची रोकड, ४५ हजार रूपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या अंगठ्या व दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १७ जुलै रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामप्रताप सैनी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील यांच्याकडे होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अभिषेक उर्फ बजरंग परशूराम जाधव (वय-१९) रा भोई गल्ली, राज शाळेच्या मागे रामेश्वर कॉलनी याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला राहत्या घरातून काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ३० जुलै रोजी रात्री ११ वाजता अटक केली. आज शनिवार ३१ जुलै रोजी दुपारी जिल्हा सत्र व न्यायालयाच्या न्यायमुर्ती ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Protected Content