Home क्राईम दौलत नगरातील बंद घर फोडून ३० हजाराची रोकड लांबविली

दौलत नगरातील बंद घर फोडून ३० हजाराची रोकड लांबविली


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दौलत नगरातील बंद घर फोडून घरातील ३० हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, भास्कर शंकर पाटील (वय-६४) रा. सुदर्शन अपार्टमेंट, दौलत नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १ एप्रिल रोजी ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले ३० हजाराची रोकड चोरून नेल्याचा प्रकार मंगळवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीला आला. त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ करीत आहे.

 


Protected Content

Play sound