मस्तच : आता येणार ‘ब्रेथलेस हनुमान चालीसा’ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे ‘हनुमान चालीसा’ हा चर्चेचा मुद्दा बनला असतांना दुसरीकडे शंकर महादेवन यांनी आपण ‘ब्रेथलेस’ या गायनाच्या प्रकारातील हनुमान चालीसा लवकरच रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांनी याआधी संगीतात एक अभिनव प्रयोग करत ‘ब्रेथलेस’ या संकल्पनेच्या अंतर्गत अल्बम रिलीज केला होता. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद देखील लाभला होता. आता त्याच धर्तीवर शंकर महादेवन हनुमान चालीसा गाताना दिसणार आहे. शंकरने याची घोषणा केली आहे. त्याच्या त्या व्हिडीओला शेमारु भक्तीच्या अकाऊंटवरनं शेअर करण्यात आलं आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून शंकर म्हणताना दिसतोय की, अद्भुत हनुमान चालिसा मी ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे. या गाण्याचा गातानाचा वेग जास्त आहे आणि खूप कठीण आहे. याच व्हिडीओत शंकरने हनुमान चालिसाविषयी आपल्याला काय वाटतं ते विचारही मांडले आहेत. ही अनोखी हनुमान चालिसा शेमारु भक्ती के यु-ट्यूब चॅनलवर दाखवलं जाणार असल्याची माहिती महादेवन यांनी यात दिलेली आहे.

शंकर महादेवनचा ब्रेथलेस अल्बम १९९८ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये त्याच्यासोबत जावेद अख्तर देखील होते. त्यानं या अल्बमचं टायटल ब्रेथलेस पद्धतीत गायलं होतं. ब्रेथलेस गाण्यात न थांबता गायचा गाण्याचा भाग जवळ-जवळ ३ मिनिटाचा होता. यामुळे आता महादेवन यांची ब्रेथलेस हनुमान चालीसा कशी असेल याबाबत उत्सुकता लागली आहे.

 

Protected Content