अयोध्यानगरात बंद घरातून ४ लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगर परिसरातील अशोक नगरात बंद घर फोडून घरातून ३ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सनी विकास सोनार (वय-३२) रा. अशोक नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लाकडी कपाटातून ३ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त असलेला दिसून आला. या संदर्भात सनी सोनार याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ३ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Protected Content