खळबळजनक : कपाळावर बंदूक लावून मुलीच्या बापाला जीवे मारण्याची धमकी !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलीचा विवाह आपल्या सोबत न केल्याचा राग आल्याने मुलीच्या बापासह एकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तर एकावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना शहरातील गणपती नगरात घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गणपती नगरात ५२ वर्षीय व्यक्ती हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह रोहित राजू सोनवणे रा. शिवाजी नगर, मलकापूर याच्याशी न केल्याचा राग आल्याने रोहीत सह इतर अनोळखी दोन जणांनी शनिवारी ३ सप्टेंबर रोजी मुलीच्या घरी येवून मुलीच्या बापाच्या कपाळावर बंदूक लावू जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. शिवाय तर प्रौढ व्यक्तीचा भाचा याला देखील इतर दोन जणांनी चाकूने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर तीनही संशयित आरोपी पसार झज्ञले आहे. याप्रकरणी पीडीत प्रौढ व्यक्तीच्या फिर्यादीवरून पाचोरा पेालीस ठाण्यात रोहीत राजु सोनवणे व अन्य दोन अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहेत. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे व पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट देवुन आरोपींना पकडण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Protected Content