वरणगाव तालुका करा : सुसरी ग्राम सभेचा ठराव

वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वरणगाव तालुका करा या मागणीचा ठराव सुसरी ग्रामपंचायातीने ग्राम सभेत पारित करण्यात आला.

 

वरणगाव ब्रिटिश काळात पूर्वी तालुका होते. जळगाव जिल्ह्यात वरणगाव मोठी बाजार पेठ होती. त्यात त्यावेळी सरकारने वरणगाव तालुका दर्जा काढून वरणगाव परिसरावर आन्यय केला. आज खरेदी विक्रीला बोदवडला जावे लागते तर शासकीय कामासाठी भुसावळला २०  ते ३०  किमीच्या फेऱ्याने जावे लागते.  वरणगाव शहराला तीस ते पस्तीस खेडे लागून आहे.  सोमवार व मंगळवार राज्यात गुरांचा बाजार मोठ्ठा भरला जातो. तसेच वरणगावला लागून दिपनगर वीजनिर्मिती केंद्र आहे. जवळच आयुध निर्माण केंद्र आहे. तसेच बाजार पेठ असून परिसर हा बागायाती व करोड वाहू शेतकऱ्यांचा परिसर आहे.  शेतीच्या माल खरेदी विक्रीसाठी बोदवड व भुसावळला तीस किमी फेऱ्याने जावे लागत असल्याने शेतकरी नागरिकांना  त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासापासून सूटकेसाठी  वरणगाव तालुका होणे गरजेचे असल्याचे माजी सरपंच रवींद्र पाटील यांनी सांगितले. ग्रामसभेत माजी सरपंच रवींद्र पाटील यांनी ठराव मांडला व अनुमोदन दिलीप राणे यांनी दिले. सभेचे अध्यक्ष सरपंच उर्मिला पाटील होत्या. ठराव हा मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून वरणगाव तालुका करा अशी मागणी समस्त सुसरिकरांनी केली आहे.

Protected Content