राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शिक्षकांचा हृद्य सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महानगरच्या शिक्षक आघाडीतर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगर जळगाव , शिक्षक आघाडी व ग्रंथालय सेल तर्फे जळगाव शहरातील चांगले कार्य करणार्‍या ३३ शिक्षकांचा सत्कार तसेच १२ मुख्याध्यापकांचा शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच माता सरस्वतीच्या फोटोला हार घालून व पुजा करुन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सदस्य आमदार माजी कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे होते.

या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस एजाज मलिक , महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदनाताई चौधरी मुलाखतकार मनोज गोविंदवार, सुमित पाटील, यशवंत पाटील,सौ प्रतिभा सुर्वे,सौ प्रतिक्षा पाटील, सलीम ईनामदार, रवींद्र पाटील , सुनिल माळी हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री.प्रविण धनगर यांनी करुन दिला.

अध्यक्षीय भाषणात म एकनाथराव खडसे यांनी शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांवर प्रकाशझोत टाकला. तसेच आपल्या शालेय जीवनातील आठवणींचा परामर्श घेतला. शिक्षकांच्या ज्या अडचणी असतील त्या विधानपरिषदेत पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील शिक्षकांनी लेखी स्वरूपात तक्रार घ्यावी असेही आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस शिक्षक आघाडीला केले.

याप्रसंगी गौरी महाजन या विघार्थीणीचा आंतर राष्ट्रीय योगा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्याने खडसे साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर, पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये सतीश साळुंखे, भंगाळे सर,सौ.प्रतिभा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले
सूत्रसंचालन वाय एस महाजन,प्रास्ताविक शिक्षक आघाडी अध्यक्ष श्री.मनोज भालेराव यांनी केले, तर आभार सागर पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आघाडी व ग्रंथालय सेलचे , महानगरचे पदाधिकारी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष जिल्हाअध्यक्ष मजहर पठाण , किरण राजपुत , रहिम तडवी , डॉ रिजवान खाटीक , राजुभाऊ मोरे, पंकज सूर्यवंशी, विजय विसपूते, प्रसाद पाटील,मुश्ताक भिस्ती,अजीज रंगरेज,जिया बागवान,साजित पठान , राहुल टोके , विशाल देशमुख , संजय जाधव , सुहास चौधरी राजु बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content