८६ लाखांच्या कामांचे गुलाबभाऊंच्या हस्ते भूमिपुजन व लोकार्पण

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विकासकामांमधील सर्वात महत्वाचा घटक हा गावाची समंजस भूमिका असतो. ही भूमिका सकारात्मक असेल तर गावाची प्रगती ही अधिक वेगाने होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील सावखेडा खुर्द व डिक्साई येथे अनुक्रमे ३४ आणि ५२ अशा ८६ लक्ष रूपयांच्या विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सावखेडा खुर्द आणि डिक्साई येथील विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. यात डिक्साई येथे ३९ लक्ष रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन करण्यात आले. यात, जलकुंभ अर्थात पाण्याची टाकी, पाईपलाईन आणि पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणच्या कुपनलिकेचा समावेश असून या कामाचा शुभारंभ ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यासोबत याच गावात स्मशानभूमि सुशोभीकरण आणि बांधकाम-१० लक्ष तर पेव्हींग ब्लॉक-३ लक्ष या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. तर, सावखेडा खुर्द येथे २४ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद असणार्‍या पाण्याच्या टाकीचे भूमिपुजन करण्यात आले. तर येथेच १० लक्ष रूपयांमधून उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. कमलाकर पाटील, माजी सभापती भरत बोरसे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी सभापती जनाआप्पा पाटील, मुकेश सोनवणे , लकी टेलर, पी.आय. रामकृष्ण कुंभार, पी.एस.आय एस. जे. वाणी, नारायण आप्पा सोनवणे, सावखेडा खु.येथिल सोसायटी चेअरमन जितेंद्र पाटील, सरपंच ऊषाबाई अरविंद सपकाळे, उप सरपंच प्रकाश कृष्णात पाटील, ग्रा. पं. सदस्य संगिता पाटील, छाया पाटील, अर्चना सपकाळे, मगला पाटील, भरत सपकाळे, बेबबाई भिल्ल, प्रविण सपकाळे, दिलीप जगताप, साहेबराव पाटील, लीलाधर पाटील, मदन पाटील,डीकसाई येथिल सरपंच अहिल्याबाई, उपसरपंच सुनंदाबाई सूर्यवंशी, ग्रा पं सदस्य सुनिल चव्हाण, पोलीस पाटील भुवनेश्वर चव्हाण, दगडू चव्हाण, किशोर कोळी, रुखमांबाई कोळी, चित्राबाई कोळी यांच्यासह डिंकसाई, सावखेडा खु., व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी सरपंच जितेंद्र पाटील यांनी केले. आभार अरूण चव्हाण यांनी मानले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण आजवर विकासाभिमुख वाटचाल केली आहे. विकास करतांना आपण कोणताही भेदभाव केला नाही. हीच भूमिका गावकर्‍यांनी घेण्याची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे, मात्र, विकासकामांसाठी एकत्र यावे. आपण देखील कधी कामांमध्ये भेद केला नाही. सावखेडा खुर्द गावासाठी पाण्याची टाकी तर डिक्साईसाठी पाण्याच्या टाकीसह पूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावांमधील पाण्याची समस्या कायमची संपुष्टात येणार आहे. तर सावखेडा येथील व्यायामशाळेच्या माध्यमातून तरूणाईला शरीरसंवर्धन करण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादनही ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

Protected Content