घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची ईर्ष्या : संजय राऊत

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आता ट्विट करुन सहावी जागा शिवसेना लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच विरोधकांवरही निशाणा साधला आहे.

सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी पाच जागा जवळपास निश्चित असून सहाव्या जागेसाठीची चुरस पाहायला मिळणार आहे. यातच आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं दावा ठोकला आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा पेच अजूनही कायम आहे. हा सहावा उमेदवार कोणाचा असेल, याबाबत सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. याच संदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलंय. महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची ईर्ष्या दिसू लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी या संदर्भातलं ट्विट केलं आहे. राऊतांनी आपल्या ट्विटमधून विरोधकांवर बोचरी टीका केली आहे. राऊत म्हणाले, “राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची ईर्ष्या दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा, त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे.

Protected Content