मैत्रेय गुंतवणूकदारांना तातडीने पैसे मिळावेत : मानव संरक्षण समितीचे आमदारांना साकडे

पाचोरा, प्रतिनिधी ।  मानव संरक्षण समितीच्या  पाचोरा तालुका आणि पाचोरा तालुका समितीने आमदार किशोर पाटील यांना मैत्रेय कंपनीमध्ये ग्राहकांनी गुंतवणूक केलेले पैसे लवकरात लवकर मिळणे या आशयचे निवेदने देवून साकडे घातले. 

आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा करतांना तालुकाध्यक्ष शशिकांत दुसाने मैत्रेय कंपनीमध्ये ग्राहकाने गुंतवणूक केलेल्या प्रलंबित रकमेबाबत बोलतांना आठ ते दहा वर्षांपासुन भडगाव आणि पाचोरा तालुक्याचे करोडो रूपये अडकून पडले असल्याची तक्रार केली.  निवेदनात मागील दोन वर्षांपासून कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे अनेक लोक आजारी पडले काहींवर उपासमारीची वेळ आली आहे.  अशा वेळी या गोरगरीब  गुंतवणूकदारांना या पैशाचा काहीच उपयोग नसल्याचे म्हटले आहे.  मैत्रेय कंपनी असोसिएशन मधील प्रतिनिधी प्रतिनिधी व ग्राहक यांच्यात अनेकदा चर्चा झाली असून अद्याप  ग्राहकांना अडकलेली रक्कम परत न मिळाल्याची तक्रार देखील करण्यात आलेली आहे. या  विषयी शासनाकडे पोहोचविला असून या विषयाची शासनाने दखल घेत मैत्रेय कंपनीची मालमत्ता शासनाने शासनाकडे जमा केले असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले असले तरी  मैत्रेय ग्राहकांना पैसे परत मिळत नाहीत याबद्दल समितीचे अध्यक्ष दुसाने यांनी खेद व्यक्त केला. आ. पाटील यांनी  जास्तीत जास्त लक्ष घालुन गोरगरिब लोकांना पैसे मिळवुन देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आमदार पाटील यांनी  हा विषय लवकरात  लवकर निकाली लावु असे आश्वासन दिले. निवेदनावर तालुका अध्यक्ष शशिकांत दुसाने, सचिव महेश कौंडिण्य, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षर्‍या असून यावेळी महिला उपाअध्यक्षा किरण पाटील, पाचोरा तालुका महिला अध्यक्षा मंदाकिनी पाटील, पाचोरा तालुका कायदेशीर सल्लागार मानसिंग सिध्दू आणि पाचोरा तालुका जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content