श्याम दिक्षीत खूनप्रकरण: दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

MIDC Khun 1

जळगाव प्रतिनिधी । मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित यांचा पैशाच्या वादातून खून प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. दोघांना 1 सप्टेंबर पर्यंत अशी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

रविवारी पहाटे शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी गतीने तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत गुन्हाचा गुन्हा उघडकीस आणला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार 24 ऑगस्टच्या रात्री हॉटेल रिगल पॅलेस, भजे गल्ली, जळगाव येथे मयत घनशाम शांताराम दिक्षीत व सुधीर महाले हे दोघं जण बसलेले होते. त्याचवेळी बाजूच्या टेबलावर मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा- सब जेलमागे,जळगाव) हा त्याच्या दोन मित्रांसोबत दारु पीत होता. तू माझ्या टेबलावर ये, यावरून यावेळी घनशामसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी मुन्नासोबत सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा- रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा देखील होता. या दोघा आरोपींना पहूर येथून आज दुपारी पोलिसांनी अटक केली होती. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर आज त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपली होती. पुन्हा दोघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

Protected Content