गोलाणी मार्केटमधून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केटसमोरून पिंप्राळा येथील प्रौढाची दुचाकी लांबविल्याची प्रकार सोमवारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, गोपाळ अशोक पोलभुणे (वय-४५) रा. मिराबाई नगर पिंप्राळा हे कामानिमित्त शहरातील गोलाणी मार्केटमध्ये कामासाठी (एमएच १९ बीटी ३१७६) क्रमांकाच्या दुकाने आले. त्यांनी गोलाणीमार्केटसमोरील मायटी ब्रदर्ससमोर सकाळी १०.३० वाजता दुचाकी पार्किंग करून लावली. सायंकाळी ५.३० वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांनी दुचाकी जागेवर आढळून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली तरी देखील दुचाकी मिळून आली नाही. गोपाळ पोलभुणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक सोनवणे करीत आहे. 

Protected Content