पाडळे खु। येथे बारा कुटुंबाना दिले गॅस कनेक्शन

raver 12

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळे खु। येथील गरीब आदिवासी एससी व एसटीतील १२ बांधवांना संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने आज गॅस कनेक्शनचे वाटप आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचा मुलगा धनंजय चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

जंगलातील वृक्ष तोड थांबवून आदिवासी बांधवांनी जास्तीत-जास्त गॅस कनेक्शनचा वापर करावा. यामुळे धुरमुक्त कुटुंब करून जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न करुया, जंगलामधील वनधन हे आपली मालमत्ता असून ती टिकवण्यासाठी सर्वमिळून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वनपाल अतुल तायडे यांनी यावेळी केले.

यामध्ये रजिया तडवी, सुशीला चांभार, देवचंद पाटील, ईश्वर महाजन, ईश्वर चौधरी, हिरालाल कोळी, नरेंद्र पाटील, कमला बनाइत, अहमद तडवी, मुस्तफा तडवी, जैनरुबा तडवी, मुस्तफा तडवी, इकबाल शहा यांना गॅस वितरण करण्यात आला असून आणखी १२ जणांना गॅस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाला संयुक्त वन समितीचे अध्यक्ष फकीरा तडवी, सचिव तथा वनपाल अतुल तायडे, वनरक्षक हरीष थोरात, वनमजूर रुस्तम तडवी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content