महसूल पथकाचा कर्तव्याला तिलांजली; जप्त ट्रॅक्टर सेटलमेंट करून सोडले

रावेर प्रतिनिधी । शहरात महसूल पथकाने एक अवैध वाळूचे ट्रॅक्टर-ट्रॉली पकडून तहसिल कार्यालयात नेले. परंतु काही वेळाने सोडुन दिल्याने एकच चर्चा रंगली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी मंडल अधिकारी व तलाठी यांच्या टिमने रावेर शहरातील आठवडे बाजार परिसरात अवैध वाळूने भरून जात असलेले स्वराज कंपनीचे ट्रक्टर-ट्रॉली पकडले पकडून सकाळी तहसिल कार्यालयाच्या परिसरात देखिल आणले परंतु काही वेळाने जप्त केलेले ट्रक्टर सोडून देण्यात आले आहे.या निमित्ताने महसूल पथकाने कर्तव्यात कसुर तर केला सोबत शासनाचा महसूल बुडविण्यास सुध्दा कारणीभुत ठरले आहे. याची दिवसभर रावेर शहरात चर्चा होती.

परवाना असल्याचा बनाव

दरम्यान यातील एक तलाठी यांच्याशी लाईव्हने संपर्क केला असता त्यांनी सांगितले की त्या ट्रक्टर-ट्रॉली जवळ परवाना होता.परंतु वाळू वाहतुकचे परवाने बंद आहे. परवाना होता तर अवैध वाळुने भरलेले ट्रक्टर-ट्रॉली तहसिल कार्यालयात का..आणले.!  स्पॉटवर तपासणी करून का. सोडले नाही.! असे अनेक प्रश्न यातुन उपस्थित होत आहे.

 

Protected Content