Breaking News : ऐनपूर येथे दोन गटात दगडफेक; पोलीस पथक घटनास्थळी दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात दोन समुदायांमध्ये दगडफेक करून वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोच रावेर तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे झेंडा लावण्यावरून दोन गटात दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. यामुळे ऐनपूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून शांततेचे आवाहन तहसीलदार बंडू कापसे यांनी केले आहे.

याबाबत अधिक असे की, गेल्या आठवड्यात यावल तालुक्यातील दहीगाव येथे मिरवणूकीत झालेल्या वादातून दोन समूदायांमध्ये वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता रावेर तालुक्यात झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण होवून दगडफेक करण्यात आल्याचे आज सकाळी समोर आले आहे. यात दोन्ही गटाकडून दगडफेक झाल्याने काही जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रावेर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीन नियंत्रणात आली आहे. दरम्यान रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही गटाला शांततेचे आवाहन केले आहे. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content