Accident : धावत्या ट्रकचे टायर निघाल्याने अपघात; एकाचा मृत्यू

वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या भरधाव ट्रकचा टायर अचानक निखळून बाहेर आल्याने टायर निघाल्याने पुढे जावून उभ्या असलेल्या एकाच्या अंगावर धडकल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना वाशीम मालेगाव तालुक्यातील अंधार सांवंगी फाट्यावर घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख मनसार शेख रोशन हे लग्नाला जाण्यासाठी मेडशी येथील अंधार सावंगी बसस्थानकावर गाडीची वाट पाहत उभे होते. याच दरम्यान मालेगाववरून अकोल्याकडे जाणारा १४ टायरचा ट्रक असल्याने दोन चाक ट्रक सोडून निघून गेले. धावत्या ट्रकचे दोन चाकं अचानक निखळून त्यांच्या अंगावर जोरदार धडकले. यामुळे ते खाली कोसळले. यानंतर त्यांना मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सदरच्या घटनेत जुम्मा छोटू गारवे हे जखमी झाले असून एका उभ्या कारचे सुद्धा नुकसान झाले आहे. टायर निघाल्याचे ट्रक चालकाला त्याची भणक सुद्धा लागली नाही. घटनास्थळी उभ्या असलेल्या नागरिकांनी ट्रक थांबवत घडलेली घटना चालकाच्या निदर्शनास आणून दिली. मृतकाचे नातेवाईक शेख जावेद शेख मंसार यांनी मेडशी (Police) पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक राकेश जाखर (रा. सलूनडिया जि. बिकानेर) यांच्या विरुध्द दाखल करण्यात आले आहे.

Protected Content