अंडापाव गाडीवर झालेल्या वादातूनच तरूणाचा चाकूने भोसकून खून !

jalgaon crime news 1

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोंबडी बाजार चौकात अंडा भुर्जी गाडीजवळ दारूच्या नशेत झालेल्या झटापटीत तरूणाचा तिक्ष्ण हत्याराने खून केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह शवविच्छेनासाठी नेण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांच्या शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास जेएमपी मार्केटमध्ये अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. बुधवारी मध्यरात्री कोंबडी बाजाराजवळ असणार्‍या एका अंडा भुर्जीच्या दुकानाजवळ या तरूणाची इतरांशी झटापट झाल्याचे दिसून आले. येथून काही अंतरावर असणार्‍या जेएमपी मार्केटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. तो रक्तबंबाळ झाला असल्याने या मार्गावर त्याच्या रक्ताळलेल्या पायाचे ठसेदेखील पोलिसांना आढळून आले आहेत.

युवराज हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या जेएमपी मार्केटमध्ये जैन ग्लोबल एंटप्रायजेस या दुकानाच्या ओट्याला लागू रक्तबंबाळावस्थेत तरूण मयतस्थितीत आढळून आला. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका अंडा-पावच्या गाडीवर झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. यात जीव वाचवण्यासाठी त्या तरूणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मृत्यूने गाठल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता मृत तरूणाचे नाव प्रशांत सिध्देश्‍वर जंगाळे ( वय-३५) असल्याची माहिती मिळाली.

कौटुंबिक पार्श्वभूमी
मयत प्रशांत जंगाळे हा गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जळगावात स्थायिक झाला होता. प्रशांत हा मुळचा धामणगाव बढे ता.जि. बुलढाणा येथील रहिवाशी आहे. वडील सिध्देश्वर रामचंद्र जंगाळे व आई कुसुमबाई जंगाळे हे धामणगाव येथे शेती करतात. तर लहान भाऊ सचिन जंगाळे हा नाशिक येथे खासगी कंपनीत कामाला आहे. मयत प्रशांतचा विवाहित असून पत्नी पल्लवी आणि मुलगा आर्यन आहे. मात्र पत्नी पासून ते गेल्या सहा वर्षांपासून विभक्त होते. शाहूनगरातील चंद्रकला डिगंबर कलाल यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून भाड्याने एकटेच राहत होते. मयत प्रशांत हा जेएमपी आणि बीजे मार्केटमधील असलेल्या प्रिंटींग प्रेसचे दुकानावर काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.

प्रिंटींग प्रेसमध्ये सोबत काम मित्रांनी त्याला फोन केला. कुठे आहे असे विचारल्यानंतर रात्री 9.30 पर्यंत दुकानावर कामाला आहे मी थोड्यावेळाने आलोच असे सांगितले. रात्री सर्व मित्र त्याची वाट पाहत होते मात्र उशीरापर्यंत आला नाही म्हणून त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतू संपर्क होवू शकला नाही. तसेच घर मालक यांना प्रिंटींगच्या कामासाठी रात्री कामाच्या ठिकाणी मुक्काम केला असावा असे वाटले. मात्र सकाळी त्याचा खून झाला हेच समजले.

श्वान पथक घटनास्थळ
परीसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांकडून तपासण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीसांनी जावून पंचनामा केला तसचे रक्ताचे नमुने खिश्यातील कागदपत्रे आधारकार्ड, पैश्याचे पाकिट आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान श्वान पथकाला देखील दाखल करण्यात आले होते.

घटनास्थळी पोलीस अधिक्षकांची पाहणी
पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर अधिक्षक निलाभ रोहन, विभागीय पोलीस अधिकरी भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, हा हल्ला नेमकी कुणी केला याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नसून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

Protected Content