जळगावात जेष्ठ नटसम्राट श्रीराम लागू यांच्या शोक सभेचे आयोजन

dr shriram lagu

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, व. वा. वाचनालय, इंडियन मेडिकल असोसिएशन व सामाजिक कृतज्ञता निधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.श्रीराम लागू यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन आज (दि.१९ डिसेंबर) रोजी सायंकाळी ६ वाजता व.वा. वाचनालय येथिल अग्रवाल हॉल येथे करण्यात आले आहे.

डॉ. श्रीराम लागू यांचे काल काल रात्री दि.१७ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एकूणच नाट्य / सिने तसेच सांस्कृतिक क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी तयार झाली आहे. अशा या अभिनयाच्या नटसम्राटस भावांजलि अर्पण करण्यासाठी सर्व रंगकर्मी कलावंत, सांस्कृतिक व सामाजिक संस्था, डॉ.लागू यांचे चहाते व रसिक जनांनी या शोकसभेत उपस्थित राहून स्वर्गीय डॉ.लागू यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, व. वा. वाचनालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, व समाजिक कृतज्ञता निधी समिती यांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content