नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन ; लेखक रामचंद्र गुहांना अटक

Ramchandra Guha

बेंगळुरू वृत्तसंस्था । सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आज देशभरासह बेंगळुरू येथे ही आंदोलन सुरु आहे. त्यांच्यासह अनेक राजकीय पक्षही आंदोलनात उतरले आहेत. यावेळी या कायद्याला विरोध करणारे इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संपूर्ण बेंगळुरूमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलकांनी आज शहरात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरु पोलिसांनी या आंदोलनासाठी मंजूरी दिली नव्हती. आंदोलक रस्त्यावर उतरणार असल्याने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पोलीस तैनात करण्यात आले होते. रामचंद्र गुहादेखील आंदोलकांमध्ये सहभागी झाले होते. यानंतर पोलिसांनी कारवाई करत जवळपास ३० जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Protected Content