जळगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज ‘एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे’ या विषयावर कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म व कृषि प्रशिक्षण संस्था अहमदनगर मार्फत शेतकर्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.
कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व कृषि प्रशिक्षण संस्था अहमदनगर यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने मराठवाडा, विदर्भ व खान्देश या भागातील जवळपास ६०० शेतकर्यांनी नोंदणी केली होती. त्या अनुषंगाने एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे याविषया वर सेंद्रिय उत्पादन घेणार्या व घेऊ इच्छिणार्या शेतकरी बंधूंसाठी ऑनलाईनद्वारे एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे, या विषयांतर्गत जीवाणू संवर्धन व त्याचा वापर , किड व रोगांचे व्यवस्थापन, खत व्यवस्थापन या विषयावर आज १६ ऑगस्ट २०२० रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार उन्मेष दादा पाटील यांनी कार्यक्रमाचे उदघाटक या नात्याने प्रमुख मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उद्घाटक खासदार उन्मेषदादा पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ हेमंत बाहेती, डॉ विशाल वैरागर, अभियंता वैभव सुर्यवंशी, तज्ञ डॉ स्वाती कदम (विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव ) प्रगतशील शेतकरी नाना पाटील (पिंपरी खुर्द) प्रगतिशील शेतकरी तुकाराम पाटील( देवळी ता चाळीसगाव) तसेच अभियंता सुयोग खोसे (संचालक कृषि प्रशिक्षण संस्था अहमदनगर) अभियंता मंगेश मांडगे(प्रशिक्षण समन्वयक) श्रेयस खाकाळ यांच्यासह अनिल भोकरे, (उपसंचालक, कृषि विभाग जळगाव ) डॉ उल्हास सुर्वे (प्राध्यापक, कृषिविद्या,मफुकृवि राहुरी) अभियंता लदत्तात्रय पाटील (सहाय्यक प्राध्यापक,व.ना.म.कृ.वि. परभणी ) सोनू पाटील ( गात तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा जळगाव ) यांची उपस्थिती होती.
खासदार उन्मेषदादा पाटील (unmesh patil mp jalgaon) पुढे म्हणाले की रासायनिक खतांच्या अतिवापराने शेत जमिनींचे आरोग्य बिघडत आहे. या खतांमुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासही धोका निर्माण झाला आहे. जमिनीतील आवश्यक अन्नद्रव्य तसेच मूलद्रव्यांचे संतुलन बिघडले आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक सेंद्रीय शेतीचा पर्याय पुढे आला आहे. संरक्षण करण्यासाठी या किटकनाशकांचा वापर केला जात असला तरी यामुळे एकूणच जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. मानवी आरोग्य आणि पर्यावरणासही धोका निर्माण होत आहे. रासायनिक खते, किटकनाशकांच्या किंमतीदेखील जास्त असतात. त्यामुळे यातून शेतमालाचे उत्पादन निघाले तरी त्यास अधिकचा भाव मिळत नाहीत. उत्पादन खर्च आणि मिळालेले उत्पन्न यांची सांगड घालतांना अनेक समस्या निर्माण होतात याकरिता खते व किटकनाशकांचा वापर टाळून सेंद्रीय शेतीचा पर्याय समोर येत आहे. पर्यावरण पूरक सेंद्रिय शेती शाश्वत विकासाचा समर्थ पर्याय शेतकरी बांधवांनी निवडावा यासाठी प्रोत्साहन दिले जावे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ स्वाती कदम विषय विशेषज्ञ कृषिविद्या कृषि विज्ञान केंद्र जळगाव च्या डॉ स्वाती कदम यांनी जीवाणू संवर्धन व त्याचा वापर या विषयावर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. प्रगतशील व सेंद्रिय उत्पादक शेतकरी तुकाराम पाटील देवळीकर यांनी कमी खर्चिक गांडूळ खत निर्मिती ,कम्पोस्टिंग इ.विषयक मर्गदर्शन केले. अभियंता वैभव सुर्यवंशी यांनी प्रशिक्षणातून मिळलेले ज्ञान आपापल्या गावातील शेतकरी मित्रांना द्यावे तसेच या सोबत कृषि विज्ञान केंद्र जळगाव द्वारे कॉविड १९ च्या कालावधी मध्ये शेतकर्यांच्या गरेजेवर आधारित व हंगाम निहाय online पद्धतीने प्रशिक्षण यापुढे देखील आयोजित करणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यानी ुुु.र्ज्ञींज्ञक्षरश्रसरेप.ेीस या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले . यावेळी बोलताना अभियंता सुयोग खोसे (संचालक कृषि प्रशिक्षण संस्था अहमदनगर ) यांनी आजच्या काळात सेंद्रिय शेती कशाप्रकारे गरजेची आहे यावर संबोधन केले. योग्य अभ्यास व सेंद्रिय शेतकरी उत्पादन घेणार्या शेतकर्यांचे अनुभव यांची सांगड घालून शाश्वत सेंद्रिय शेती करावी असे नमूद केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियंता वैभव सूर्यवंशी व आभार प्रदर्शन अभियंता मंगेश मांडगे यांनी केले.