जळगावात रसवंती दुकानाला अज्ञातांनी लावली आग; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पार्वतीनगरात राजेंद्र पाडुरंग बेलदार यांच्या ऊसाच्या रसवंतीला आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत रसवंतीवरील सर्व खुर्च्या, पाण्याचे टब, कापडी जाळी, रसवंती मशीन असे साहित्य जळून खाक झाले असून नुकसान झाले आहे. रसवंती मालक राजेंद्र बेलदार यांनी ही अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला असून याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पार्वतीनगरा राजेंद्र बेलदार हे पत्नी, आई व दोन मुलांसह वास्तव्यास आहे. गिरणा टाकीजवळी रस्त्यालगत त्यांचे ऊस रसवंतीचे दुकान आहे. या दुकानावर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. या रसवंतीला शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आग लागली. गिरणा टाकी येथील महापालिकेच्या कर्मचार्‍यांना प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग विझविली. व घडलेला प्रकार रसवंती मालक राजेंद्र बेलदार यांना कळविला. बेलदार यांनी तत्काळ रसवंती गाठली. याठिकाणी आग आटोक्यात आली होती. पाहणी केली असता, आगीत पाण्याचे टब, रसवंती मशीन, खुर्चा, कापडी जाळी, टेबल असे 60 ते 70 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान ज्या पध्दतीने ही आग लागली, त्यानुसार कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रॉकेलच्या सहाय्याने रसवंती पेटवून दिल्याचा बेलदार यांना संशय असून याप्रकरीण त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

Protected Content